धरणांमुळे साताऱ्याचा चौफेर विकास (संडे स्पेशल)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:27+5:302021-03-20T04:39:27+5:30

सातारा जिल्हामध्ये कोयना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होते. जिल्ह्यातील कन्हेर, उरमोडी, धोम, धोम बलकवडी असे मोठे प्रकल्प तर येरळवाडी, ...

Development of Satara due to dams (Sunday Special) | धरणांमुळे साताऱ्याचा चौफेर विकास (संडे स्पेशल)

धरणांमुळे साताऱ्याचा चौफेर विकास (संडे स्पेशल)

सातारा जिल्हामध्ये कोयना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होते. जिल्ह्यातील कन्हेर, उरमोडी, धोम, धोम बलकवडी असे मोठे प्रकल्प तर येरळवाडी, नेर, रानंद, आंधळी हे मध्यम प्रकल्प जनतेसाठी वरदान ठरलेले आहेत. जिल्ह्यामध्ये माण, खटाव, फलटण, खंडाळा या अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये वेळोवेळी दुष्काळ पडत असल्याने ज्या तालुक्यांसाठी धरणात साठवलेल्या पाण्याचा उपयोग होतो. धरणातील मुबलक पाण्यामुळे जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढले आहे, त्याचबरोबर लोकांना पिण्याच्या पाण्याची भ्रांतदेखील मिटलेली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी साठवण्याच्या आनुषंगाने सामाजिक उपक्रमातून अनेक कामे झाली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी वॉटर बकेट तयार झाले. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने दुष्काळी भागातही आता पाणी पाहायला मिळत आहे.

सिंचन विभागाकडून कालवा सल्लागार समितीच्या सूचनेनुसार धरणांतील पाणी कालव्यात सोडले जाते. पाटातील पाण्याच्या रब्बी हंगामासाठी तीन पाळ्या, खरीप हंगामासाठी दोन पाळ्या तर उन्हाळा अन् गावासाठी तीन पाळ्या दिल्या जातात. धरणांतील पाणी कालव्यामध्ये सोडले जाते, त्यामुळे लाभक्षेत्रातील विहिरी बोरवेल यांना बारमाही पाणी राहते याचा फायदा शेतीसाठी तसेच पिण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.

धरण निहाय वापरले जाणारे पाणी (सर्व आकडे टीएमसीमध्ये)

कोयना एकूण क्षमता १०५.२५ , जिवंत साठा १००.२५, सिंचनासाठी ३७.५, पिण्यासाठी २.६८, जलविद्युतसाठी ६७.५

कन्हेर एकूण क्षमता १०.१, जिवंत पाणीसाठा ९.५९, सिंचनासाठी ९.४, पिण्यासाठी २.१६, औद्योगिक वापरासाठी ०.१९,

उरमोडी एकूण क्षमता ९.९६, जिवंत पाणीसाठा ९.६५, सिंचनासाठी ८.९४, पिण्यासाठी ०.१७७, औद्योगिक वापरासाठी ०.००४

धोम एकूण क्षमता १३.५, जिवंत पाणीसाठा ११.६९, सिंचनासाठी ७.५८, पिण्यासाठी २.६४, औद्योगिक वापरासाठी ०.२३,

धोम बलकवडी एकूण क्षमता ४.०८, जिवंत पाणीसाठा ३.९६, सिंचनासाठी २.७, पिण्यासाठी ०.०७

सातारा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १०,४८,४००

जिल्ह्यामध्ये ११ मोठे, १७ मध्यम, ६७ लघू, ७ उपसा सिंचन योजना तर ६४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असे सिंचन प्रकल्प आहेत.

जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये ७,९०९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झालेला आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचनक्षमता ७,७१,२७२ हेक्टर आहे. जिल्ह्यामध्ये एकूण प्रत्यक्ष सिंचनाखाली असलेली ३,१८,४२५ हेक्टर इतकी जमीन आहे.

- सागर गुजर

Web Title: Development of Satara due to dams (Sunday Special)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.