शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहात घाण केली म्हणून चक्क रुग्णांना दंड!

By admin | Updated: April 21, 2015 01:00 IST

पाटण ग्रामीण रुग्णालय : साफसफाईसाठी प्रत्येकी शंभर रुपये

अरुण पवार -पाटण  --वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचारी यांच्यातील वादात पाटण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार अडकलेला असतानाच आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. रुग्णालयातील आंतररुग्ण विभागातील रुग्णांकडून आणि प्रसूती झालेल्या महिलांकडून शौचालय व स्वच्छतागृहात घाण केली म्हणून साफसफाईसाठी प्रत्येकी शंभर रूपये वसूल केल्याचा प्रकार घडला. त्याची पावती दिली असून त्यावर कोणत्या कारणासाठी वसूली केली याबाबत मात्र कसलाच उल्लेख केलेला नाही. मोफत सेवा दिल्या जाणाऱ्या शासकीय रुग्णालयात जर रुग्णांकडून अशी नियमबाह्य वसुली होत असेल तर तो अन्याय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांमधून उमटत आहे.तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांची काळजी घेणारे शासकीय रुग्णालय म्हणून पाटण रुग्णालयाकडे पाहिले जाते. तरीही डॉक्टर व कर्मचारीच रुग्णांना त्रासदायक ठरत असल्यामुळे या रुग्णालयाबाबत सतत तक्रारी होत आहेत. वैद्यकीय अधिकारी विरुद्ध कर्मचारीगेल्या महिनाभरापासून पाटण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकविरुद्ध कर्मचारी असा वाद निर्माण होऊन संप, आंदोलने झाली. या वादामुळे रुग्णांचे हाल झाले. याबाबत आमदार शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात बैठक घेऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णांना चांगली सेवा देण्याबाबत आदेशही दिला. मात्र, त्याही पुढे जाऊन रुग्णांकडूनच शंभर रुपये वसुली करण्याचा प्रकार घडला.रुग्णांनी शौचालय व स्वच्छतागृहात घाण केली होती. त्यामुळे ते तुंबले होते. त्याची सफाई करण्यासाठी रुग्णांकडून शंभर रुपये वसूल केले. त्याच्या पावत्या दिल्या आहेत. रुग्णांना शिस्त लागावी म्हणून दंड वसूल केला आहे. एवढाच यामागचा हेतू आहे.- डॉ. पी. एल. वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पाटण