शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

हक्कभंग आणणारा लोकप्रतिनिधी संकुचित वृत्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

सातारा : अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आमदार महेश शिंदे हे करत आहेत. संकुचित विचारांचा लोकप्रतिनिधी मिळाला हे लोकांचे खरे ...

सातारा : अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आमदार महेश शिंदे हे करत आहेत. संकुचित विचारांचा लोकप्रतिनिधी मिळाला हे लोकांचे खरे दुःख आहे, हे यातून दिसते. लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून आलात. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ आहे. गत २५ वर्षांपासून आमदार शशिकांत शिंदे पुनर्वसित गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्या आग्रहाखातर लावलेल्या बैठकीला बोलावले नाही म्हणून अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव कसा काय आणला जाऊ शकतो, असा सवाल संजय शेलार यांच्यासह धोम धरणग्रस्त सर्व सरपंच संघटनेने केला आहे.

याप्रकरणी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘तुम्ही आमदार नव्हता त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी पुनर्वसित गावांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. आमदार शशिकांत शिंदे हे फक्त कोरेगाव मतदारसंघच नव्हे तर जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सोडवत असतात. विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून जेवढा तुमचा अधिकार आहे, तेवढाच अधिकार आमदार शशिकांत शिंदे यांचाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांची वेळ मागून घेतलेली बैठक हक्कभंग कसा होऊ शकतो. लोकप्रतिनिधींनी राजकीय दबाव निर्माण करायचा म्हणून आणलेला हा हक्कभंग फार काळ टिकणारा नाही. जनतेला त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकाऐवजी दोन लोकप्रतिनिधी मिळालेले असताना, आपण संकुचित वृत्तीचे राजकारण करत असाल तर ते चुकीचे आहे. आमदार शशिकांत शिंदे तर त्यांच्या अधिकारातून लोकांचे प्रश्न सोडवतील. शासकीय कामावेळी बोलावले नाही तर हक्कभंग होऊ शकतो. परंतु, या बाबतीत नाही. अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी विकासकामे व पुनर्वसन संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीबाबत हक्कभंग प्रस्ताव मांडला. हा तर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आमदार महेश शिंदे यांनीही काही अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत, त्याला आमदार शशिकांत शिंदे यांना कधीही बोलावले नाही, असे धोम धरणग्रस्त सरपंच संघटना साताऱ्याचे सचिव व भिवडी पुनर्वसन ति. कोरेगावचे सरपंच संजय शेलार यांनी म्हटले आहे.