शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ‘रिपाइं’चे भीक मांगो आंदोलन

By admin | Updated: November 24, 2015 00:26 IST

कुसुंबी-कोळघर रस्ता बेकायदा उत्खननप्रकरणी ठेकेदारावर फौजदारीची मागणी

कुडाळ : कुसुंबी-कोळघर रस्त्याच्या बेकायदेशीर झालेल्या उत्खननाबद्दल ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी जावळी तालुका रिपाइंच्या वतीने सोमवारी मेढ्याच्या आठवडा बाजारात भीक मांगो आंदोलन केले. भीक तहसीलदार रणजित देसाई यांच्या टेबलावरच ठेवल्याने गोंधळ उडाला. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिकचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो भीमसैनिक व बाधित शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांसाठी बाजारात भीक मागितली. या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाने मात्र बाजारकरांची चांगलीच करमणूक झाली.कुसुंबी-कोळघर रस्त्याच्या रुंदीपेक्षा केवळ पवनचक्क्यांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आले आहे. त्यात ठेकेदार, पवनचक्की मालक व अधिकाऱ्यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप संजय गाडे यांनी यावेळी बोलताना केला. गाडे म्हणाले, ‘१४७ शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये गेल्या असून, त्यातील ४७ शेतकरी नवबौद्ध आहेत. मूळ ठेकेदार व मालकांनी या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले असून, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा गाडे यांनी तहसीलदारांसमोरच दिला. वेळ पडल्याच तहसीलदारांसमोर आत्मदहनही केले जाईल.’ तासभर चर्चा होऊनही ठोस निर्णय झाला नाही. तहसीलदार देसाई यांनी शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. (प्रतिनिधी)तहसीलदारांच्या टेबलावर भिकेचे पैसे आरपीआयचे कार्यकर्ते घोषणा देत बाजारात भीक मागत मागत तहसील कार्यालयात आले. तहसीलदारांनी त्यांना चर्चेसाठी आत बोलावल्यावर संजय गाडे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून टोपलीत मिळालेली भीक तहसीलदारांच्या टेबलावरच ठेवली. तेव्हा तहसीलदार रणजित देसाई अवाक्च झाले. पोलीस पोलीस करत त्यांनी हे काय आहे, असं म्हटल्यावर पोलिसांनी पळत येऊन त्या टोपल्या गायब केल्या.