शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भोंदुगीरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमा, अंनिसची मागणी 

By प्रगती पाटील | Updated: June 27, 2024 18:28 IST

सातारा : पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, मौल्यवान आर.पी. कॉइन तयार करून ५० कोटी मिळवून देतो, विज ...

सातारा : पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, मौल्यवान आर.पी. कॉइन तयार करून ५० कोटी मिळवून देतो, विज पडलेल्या दगडाचे भांडे मिळवून देतो अशी आमिषे दाखवून ३६ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन अटक केली. भोंदुगीरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमा अशी मागणी अंधश्रध्दा निमुर्लुन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेवून केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. या प्रकरणांमध्ये अनेक जणांची फसवणूक झाली आहे. हे मोठे फसवणुकीचे रॅकेट असावे असा संशय आहे. संशोधनासाठी लागणाऱ्या मौल्यवान वस्तू तयार करून त्यातून करोडो रुपये मिळवून देतो अशा भुलथापा देऊन काही मांत्रीक लोकांना लाखोचा गंडा घालत आहे.फसव्या विज्ञानाच्या काही ट्रिक वापरून, हात चलाखी करून लोकांना भुरळ घातली जाते. हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत. पैश्याचा पाऊस ही अंधश्रध्दा आहे. सुशिक्षित लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा शाखेचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी केले आहे. अशी फसवणूक झालेले आणखी कोणी तक्रारदार असतील तर त्यांनी पुढे येवून पोलिसांशी अथवा जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.

सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये काही दिवसांच्या गुप्तधनासाठी खड्डा खोदलेला होता, पाटणमध्ये देखील दोन वर्षांच्या पूर्वी नरबळीची घटना झाली होती. पाटण मधील दुर्गम भागात अजून देखील मोठ्या प्रमाणांत भोंदूगिरी चालते. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळणे आवश्यक आह, असे मत सातारा अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर वंदना माने यांनी व्यक्त केले आहे.

जादुटोणाविरोधी कायदा प्रचारासाठी प्रशिक्षणसांगली जिल्हा प्रमाणे म्हैसाळ येथे फसवणूक करून संपूर्ण कुटुंब मांत्रिकाने विष देऊन संपवले होते. यात पैशाचा पाऊस अशा गोष्टी असल्यानं म्हैसाळ सारख्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जादुटोणा विरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा अशी मागणी या निमित्ताने अंनिस करत आहे. पोलीस प्रमुख समीर शेख यांना अंनिसचे शिष्टमंडळ भेटून जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी जिल्हा व्यापी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत अशी मागणी करणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरblack moneyब्लॅक मनी