शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

दिवाळीनंतर सभांचा बार; पंतप्रधान, विरोधी पक्षनेते येणार !; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सभांचीही मागणी 

By नितीन काळेल | Updated: October 30, 2024 19:39 IST

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीनंतरच नेत्यांच्या सभांचा बार उडणार आहे. यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या ...

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीनंतरच नेत्यांच्या सभांचा बार उडणार आहे. यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभाचे नियोजन सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी नेत्यांच्या सभेची मागणीही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरुन झाले आहेत. आता ४ नोव्हेंबरला अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच प्रचाराला वेग येणार आहे. त्यातच सध्या दिवाळी असल्याने शांत वातावरण आहे. त्यामुळे ५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीतूनही नियोजन सुरू झालेले आहे. सातारा जिल्ह्यातही आघाडी आणि युतीतच प्रामुख्याने लढती होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरू झालेले आहे. तसेच काही पक्षांनी वरिष्ठांकडे सभांचीही मागणी केलेली आहे.महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांची मागणी होत आहे. पण, राज्यात वरिष्ठ नेत्यांच्या सभांची कोठे आवश्यकता आहे, त्यानुसार या सभा होणार आहेत. सातारा जिल्ह्यातही सभा घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही सभा होणार आहेत.महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होईल. तसेच जिल्ह्यात उध्दवसेनेचे दोन उमेदवार आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचीही सभा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024