Maratha Kranti Morcha साताऱ्यात पाच शिवकन्येंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:33 IST2018-07-25T14:30:01+5:302018-07-25T14:33:58+5:30
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह सर्व मागण्यांचे निवेदन प्रिया साबळे, मयुरी फडतरे, भाग्यश्री पवार, शिवानी घोेरपडे, पूजा काळे या शिवकन्येंच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Maratha Kranti Morcha साताऱ्यात पाच शिवकन्येंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातारा : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह सर्व मागण्यांचे निवेदन प्रिया साबळे, मयुरी फडतरे, भाग्यश्री पवार, शिवानी घोेरपडे, पूजा काळे या शिवकन्येंच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औंरगाबाद येथे झालेल्या दु:खद घटनेमुळे राजवाड्यापासून मोर्चाने चालत जिल्हाधिकारी कार्यालय येथे सातारा जिल्हा बंदचे एक दिवसाचे आव्हान देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर परळी वैजनाथ ठोक मोर्चाच्या पाठिंब्यासाठी ठिय्या आंदोलन चालू ठेवले आहे.
या आहेत मागण्या..
१) मराठा आरक्षण लवकर जाहीर करावे
२)बंद कालावधीत ज्या मराठा बांधवांवर गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत
३) काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने गोदावरी नदीत मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली त्याला हुतात्मा घोषित करून ५० लाख रुपये शासनाने द्यावेत व भावाला सरकारी नोकरी द्यावी तसेच बंद कालावधीत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांनापण शासनाने ५० लाख एवढी मदत द्यावी व याची अंमलबजावणी करावी.
४) सध्या सरकारने जी ७२ हजार नोकरी भरती जाहीर केली. त्या भरतीला मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी.
५) बिंदू नामावली नोंदवही बेकायदेशीर खुल्या प्रवर्गाच्या जागा अतिरिक्त केलेल्या आहेत, त्या दुरुस्त करणे व तोपर्यंत नोकर भरतीला स्थगिती देणे.
६) सेवाज्येष्ठताप्रमाणे अधिकारी, कर्मचारी पदोन्नती मराठा डावलले जात आहेत तेव्हा त्यांना पदोन्नती द्याव्यात.
७) सरकारने विद्यार्थ्यांना ५० टक्के फीमध्ये सवलत आर्थिक दुर्बल घटकांना लागू केली आहे. ती संपूर्ण मराठा समाजाला विनाअट पूर्ण फी माफ करावी.
८) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच करावे.
९) मराठा वसतिगृहाची जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्ष २०१८ मध्ये करावी.