मूर्तीकारांना भेडसवतोय कुशल मदतनीसांची कमतरता !
By Admin | Updated: July 2, 2017 16:46 IST2017-07-02T16:46:33+5:302017-07-02T16:46:33+5:30
गणेशोत्सवाची चाहूल : कुंभारवाड्यात लगबग

मूर्तीकारांना भेडसवतोय कुशल मदतनीसांची कमतरता !
सातारा : सुबक व आकर्षक मुर्ती घडविणासाठी मुतीर्कारांना कलात्मक कारागिरांची मोठी गरज असते. गणेश मुर्ती वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्य बळाचा उपयोग होत असल्याने या काळात त्यांना मोठी मागणी असते. कौशल्य व कलात्मक मनुष्यबळ या काळात प्रत्येक मुतीर्कारांना हावा असतो परंतु कुंभारवाड्यातील सध्यास्थिती पाहता मुख्य मुतीर्कारांना मदतनीस व कारागिराचा तुटवडा भासत आहे.
गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या कुंभारवाड्यात फेऱ्या वाढल्या आहेत. मंडळाची मुर्ती सुंदर व आकर्षक व मोठी असावी यासाठी मुतीर्कारांना आवडीचे छायाचित्र दाखवून त्याप्रमाण मुतीर्चा आग्रह मंडळाचे कर्यकर्ते धरत आहेत.
साताऱ्यातील गणेश मंडळांची वाढती संख्या पाहता त्या मनाने मुतीर्कार व मदतनीसांचे प्रमाण अल्प आहे़ मुतीर्ची संख्या अधिक असल्याने मुतीर्कार पुढे वेळेत मुर्ती देण्याचे मोठे आव्हान उभे आहे़
साताऱ्यात गणेश मूर्ती बनविण्याचे ठिकाण असलेले गडकर आळी, बुधवार पेठ, रविवार पेठ त्याच प्रमाण परळी येथील कुंभारवाडामध्ये गणेशमूर्ती कार्यकर्त्यांनी ठरविलेल्या आहेत़ परंतु कारागिरांच्या तुटवडा ही मोठी समस्या मुतीर्कारांपुढे पडली आहे. काळाच्या ओघात कलात्मक क्षेत्राची ओढ कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मुतीर्कार मदतनीस व कारागिरांच्या शोधा शोध करीत आहेत. जादा रोजगार देण्याची तो हमी देत आहे. तरी ही मदतनीस व कारागिर उपलब्ध होत नाहीत़