रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ओळख पटली नाही : लोणंद रेल्वे स्टेशनजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 18:34 IST2017-12-09T18:29:45+5:302017-12-09T18:34:50+5:30
रेल्वेची धडक बसून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना लोणंद रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी घडली. संबंधित महिलेची ओळख पटली नसून रेल्वे पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत. रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र, अद्याप तिच्या नातेवाईकांचा शोध लागला नाही. या घटनेची वाठार पोलिस दूरक्षेत्रात नोंद झाली आहे.

रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ओळख पटली नाही : लोणंद रेल्वे स्टेशनजवळील घटना
सातारा : रेल्वेची धडक बसून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना लोणंद रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी घडली. संबंधित महिलेची ओळख पटली नसून रेल्वे पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
संबंधित महिला लोणंद रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी आली होती. तिच्यासोबत कोणीही नव्हते. रेल्वेची धडक बसल्यानंतर संबंधित महिला खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मात्र, तरीही त्या महिलेला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र, अद्याप तिच्या नातेवाईकांचा शोध लागला नाही. या घटनेची वाठार पोलिस दूरक्षेत्रात नोंद झाली आहे.