पत्नीने पेटविलेल्या पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:06 IST2017-12-27T05:06:02+5:302017-12-27T05:06:04+5:30

कोयनानगर (जि. सातारा) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या पतीचा सोमवारी रात्री उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

Death of wife spurned husband | पत्नीने पेटविलेल्या पतीचा मृत्यू

पत्नीने पेटविलेल्या पतीचा मृत्यू

कोयनानगर (जि. सातारा) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या पतीचा सोमवारी रात्री उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. २० डिसेंबर रोजी पाटण तालुक्यातील रिसवड येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी कोयना पोलिसांनी पत्नी सीता बाळू रोकडे (३९) हिला अटक केली आहे.
रिसवड या कोयना विभागातील दुर्गम गावातील बाळू संपत रोकडे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नी सीताला होता. त्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे चिडलेल्या सीता हिने २० डिसेंबरच्या सकाळी बाळू यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. शेजारी राहणारा त्यांचा पुतण्या रवींद्र्र याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न केला. यामध्ये तोही गंभीररीत्या भाजला. दोघांनाही उपचारांसाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री बाळू यांचा मृत्यू झाला.

Web Title: Death of wife spurned husband