शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: उपाशीपोटी दिवसभर दारू पिला; युवक रस्त्यावरच जीवाला मुकला!

By संजय पाटील | Updated: March 14, 2024 18:14 IST

कऱ्हाड : दिवसभर उपाशीपोटी राहून दारु पिल्यानंतर भरऊन्हात रस्त्याकडेला पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला. कऱ्हाडातील बसस्थानकानजीक ही घटना घडली. अभिजीत ...

कऱ्हाड : दिवसभर उपाशीपोटी राहून दारु पिल्यानंतर भरऊन्हात रस्त्याकडेला पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला. कऱ्हाडातील बसस्थानकानजीक ही घटना घडली. अभिजीत रामचंद्र सरोटे (रा. येवती, ता. कऱ्हाड) असे मृत युवकाचे नाव आहे.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बसस्थानकानजीक बिरोबा मंदिर ट्रस्टसमोर काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह नागरीकांना आढळला. नागरीकांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी मृताबद्दल चौकशी केली. मात्र, त्याची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा त्याची ओळख पटली. येवती येथील अभिजीत सरोटे या युवकाचा तो मृतदेह असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर कुटूंबियही तातडीने कऱ्हाडात दाखल झाले. त्यांनीही मृताला ओळखले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला.दरम्यान, पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मृत अभिजीत यास दारूचे व्यसन होते, अशी माहिती समोर आली. बुधवारी दिवसभर तो मद्यधुंद अवस्थेत होता. काहीही खाल्ले नव्हते. अति मद्यप्राशन आणि उपाशीपोटी अवस्थेत तो दिवसभर उन्हात रस्त्याकडेला पडून होता. त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे कारण गुरूवारी दुपारी शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस