Death of the elderly on the wall in Malatan | मलटण येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू
मलटण येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू

ठळक मुद्देमलटण येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यूगाढ झोपेत असताना भिंत अंगावर कोसळली

सातारा : गाढ झोपेत असताना भिंत अंगावर कोसळल्याने सीताराम रामचंद्र जुवेकर (वय ९०, रा. मतपुरा पेठ, मलटण, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

सीताराम जुवेकर हे नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेले. मंगळवारी रात्री जोरदार वारे आणि पाऊस पडत होता. मध्यरात्री अचानक घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. मोठा आवाज झाल्याने घरातील इतर लोक जागे झाले. भिंतीखाली ते सापडले होते. आरडाओरड ऐकून इतर नागरिक त्यांच्या मदतीला आले.

भिंतीखाली सापडलेल्या सीताराम जुवेकर यांना ढिगाऱ्याखालून कसेबसे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


Web Title: Death of the elderly on the wall in Malatan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.