शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Satara: कण्हेर धरणात बुडालेल्या अकलूजच्या भावी डाॅक्टरचा मृतदेह सापडला

By दत्ता यादव | Updated: April 24, 2023 14:09 IST

पोहताना धरणाच्या मधोमध गेल्यानंतर स्वराजला दम लागला अन् तो गटांगळ्या खात बुडाला

सातारा : कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दतील कण्हेर धरणात बुडालेल्या अकलूजच्या  भावी डाॅक्टरचा तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी धरणात तरंगत असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.स्वराज संभाजी माने-देशमुख (वय २३, रा. अकलूज, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) असे मृत भावी डाॅक्टरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त शनिवार, दि. २२ रोजी सर्व काॅलेज व शाळांना सुटी होती. साताऱ्यातील नामांकित मेडिकल काॅलेजची दहा मुले कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासमवेत स्वराज सुद्धा गेला होता. स्वराजला चांगले पोहता येत होते. त्याच्यासह अन्य दोन मुले पोहण्यासाठी धरणात उतरली. स्वराज आणि त्याचे दोन मित्र पोहत धरणात दूरवर गेले. धरणाच्या मधोमध गेल्यानंतर तिघेही मुले परत निघाली. मात्र, त्यावेळी स्वराजला दम लागला. तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांच्या निदर्शनास आला. परंतु त्यांनाही दम लागल्यामुळे ती दोन्ही मुले कशीबशी धरणाच्या काठावर पोहत आली. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. धरणात मधोमध अंतर खूप असल्यामुळे कोणालाही स्वराजजवळ पोहोचता आले नाही. अखेर तो धरणात बुडाला. या प्रकाराची माहिती पोलिसांसह शिवेंद्रसिंहराजेंच्या रेस्क्यू टीमला मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी साडेपाच तास शोध माेहीम राबविली. मात्र, स्वराजचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पुन्हा सात वाजता शोध मोहीम हाती घेण्यात आली. परंतु हाती मृतदेह लागलाच नाही. अखेर तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रेस्क्यू टीम धरणाजवळ पोहोचली. त्यावेळी स्वराजचा मृतदेह तरंगत काठावर आला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून स्वराजचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नातेवाइकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. स्वराज हा साताऱ्यातील एका मेडिकल काॅलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू