शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

दसरा-दिवाळीपेक्षाही निवडणूक सण मोठ्ठा!

By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST

निवडणुकीच्या निकालानंतर दोनच दिवसांनी दिवाळी असल्याने यंदा कुणाचा ‘अ‍ॅटमबॉम्ब’ वाजणार आणि कुणाचा ‘तोटा’ फुसका निघणार यावर विभागवार पैजा

राजेंद्र लोंढे-मल्हारपेठ  -‘दसरा सण मोठा; नाही आनंदा तोटा’ म्हणत नवरात्र उंबरठ्याशी असताना आणि पाठोपाठ दिवाळी येत असतानाही ग्रामीण भागात निवडणूक हाच मोठ्ठा सण ठरला आहे. कार्यकर्त्यांच्या हालचाली गावोगावी वाढल्या असून, दसरा-दिवाळीला लाजवेल, अशी वातावरणनिर्मिती झाली आहे.निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, पाटण तालुक्यात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी दिसणारी न्यारी ‘झिंग’ जाणवू लागली आहे. आचारसंहितेच्या पालनाचा सरकारी कर्मचाऱ्यांकडून गाजावाजा सुरू झाला असला, तरी कामे खोळंबलेला माणूससुद्धा आपल्या कामापेक्षा निवडणूक महत्त्वाची मानून पारावर राजकीय गप्पा मारू लागला आहे. पाटण तालुक्यातील लढत नेहमीच तुल्यबळ असते. अशा तुल्यबळ गटांत यंदा बाजी कोण मारणार, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.पाटणमधील दोन्ही प्रबळ राजकीय गटांची ताकद समसमान असल्याचे पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी दिसून आले आहे. गावोगावी कार्यकर्ते, तरुण मंडळे यांच्यात दोन गट पडले आहेत. प्रत्येक जण आपापल्या गटासाठी तावातावाने सरसावून बोलू लागला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दोनच दिवसांनी दिवाळी असल्याने यंदा कुणाचा ‘अ‍ॅटमबॉम्ब’ वाजणार आणि कुणाचा ‘तोटा’ फुसका निघणार यावर विभागवार पैजा लागल्या आहेत.