गृहविलगीकरण धोक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:06+5:302021-09-11T04:41:06+5:30
केवड्याच्या सुगंधाचा दरवळ सातारा : गणेश पूजनात विशेष महत्त्व असल्याने गणेशोत्सवात फुलांबरोबर केवड्याची विक्री होते. बाप्पांच्या प्रतिष्ठापना व पूजा ...

गृहविलगीकरण धोक्याचे
केवड्याच्या सुगंधाचा दरवळ
सातारा : गणेश पूजनात विशेष महत्त्व असल्याने गणेशोत्सवात फुलांबरोबर केवड्याची विक्री होते. बाप्पांच्या प्रतिष्ठापना व पूजा विधीमध्ये केवड्याच्या पानांना महत्त्व असल्याने त्यांची विक्री सध्या जोरकसपणे सुरू आहे. या पानांमुळे बाजारपेठेत सुगंधी दरवळ आहे
संगणकीकरण त्रासदायक
सातारा : संगणकीकृत सातबारा उताऱ्यावर शब्दांच्या चुका राहत असल्यामुळे त्रास होत आहे. सातबारा उतारा तयार झाल्यावर त्यावरील नाव गायब होणे, याबरोबरच नावात चुका होत असल्याने मिळकतधारकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. अनेक कुटुंबांमध्ये यावरून कलहही निर्माण झाला आहे.
कारवाईची मागणी
सातारा : कोरोनाकाळात रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासन प्रयत्न करत आहे. असे असतानाही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून रुग्णांना वेठीस धरले आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने जिल्हा रुग्णालय प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घ्या
सातारा : विहीर दुरुस्तीसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी केले. नवीन बांधकामासाठी २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती, खोदाई, बांधकामाला ५० हजार, वीज जोडणीसाठी २० हजार, वीज पंपासाठी २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
फळांची आवक वाढली
सातारा : गणेशोत्सवाया पार्श्वभूमीवर शहरासह परिसरातील बाजारपेठेत फळांची आवक वाढली आहे. श्रावणात व्रत-वैकल्यामुळे फळांना चांगली मागणी होती. गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाही फळांना चांगली मागणी वाढत आहे. मुबलक फळांमुळे यांचे दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत.
..........................