शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
5
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
6
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
7
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
8
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
9
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
10
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
11
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
12
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
13
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
14
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
15
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
16
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
17
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
18
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
19
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
20
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!

Satara- ग्राऊंड रिपोर्ट: मृत्यूच्या काठावरुन धोकादायक प्रवास, उड्डाणपुलांवरच महामार्ग तोडला 

By संजय पाटील | Updated: May 29, 2025 18:01 IST

वाहने कोसळण्याची भिती; अपघात वाढले

संजय पाटीलकऱ्हाड : सहापदरीच्या रेट्यात महामार्गासह उपमार्गाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. उंब्रजपासून कऱ्हाडपर्यंतचे उपमार्गही सहापदरीने पूर्णपणे गिळलेत. त्यातच उड्डाणपुलावर महामार्ग तोडण्यात आल्याने वाहनधारकांचा मृत्युच्या काठावरुन धोकादायक प्रवास सुरू आहे. चालकाचा फुटभर अंदाज चुकला तरी वाहन थेट खाली कोसळण्याची शक्यता असून ठिकठिकाणी अशी परिस्थिती आहे.उंब्रज ते कऱ्हाड हे अंतर सरासरी सतरा किलोमीटरचे. मात्र, या अंतरात पंधरापेक्षा जास्त ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. ठीकठिकाणी महामार्ग तोडला गेला आहे. नवीन महामार्ग, उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजलेत. त्याबरोबरच सुरक्षात्मक उपाययोजना नसल्यामुळे अपघातांचे प्रमाणही कित्येक पटींनी वाढले आहे. काही ठिकाणी केवळ दगड उभे करून सुरक्षिततेचा दिखावा केला गेला आहे. तर काही ठिकाणी दोन-दोन फुटांचे खांब उभे करून हास्यास्पद सुरक्षा व्यवस्था उभारली गेली आहे.सहापदरीसाठी ठिकठिकाणचे उपमार्ग महामार्गाला जोडले गेले आहेत. त्यामुळे  स्थानिकांची रहदारी महामार्गावरूनच सुरू आहे. काही ठिकाणी नवीन उपमार्गासाठी खोदकाम केले आहे. मात्र तेही अर्धवट सोडण्यात आल्यामुळे खोदलेल्या खड्ड्यात पाण्याचे डोह साचले आहेत. परिणामी त्यामध्ये पडून एखाद्याचा जीव जाण्याची अथवा वाहन कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वळण मार्गांमुळे डोकेदुखीउंब्रजपासून कऱ्हाडपर्यंत काही ठिकाणी सहापदरीच्या कामामुळे वळण मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्याबरोबरच स्थानिक वाहतुकीसाठीही उपमार्गावर वळण मार्ग बनविण्यात आले आहेत. मात्र, हे मार्ग अपघाताचे कारण बनत आहेत.

कुठून जायचं तेच कळेना!वाहनाला गती आली की समोर ‘डायव्हर्शन’चा फलक दिसतो. उपमार्गावर वाहन घातले की अरुंद रस्ता सुरू होतो. आणि उपमार्ग संपताच पुन्हा वळण घेऊन महामार्गावर जावे लागते. त्यामुळे या सर्कशीत नेमकं जायचं कुठून, हेच चालकांना कळेनासे होते.

उघड्या गटरचा धोका जास्तमहामार्ग आणि उपमार्गाच्या मध्यभागी आठ ते दहा फूट खोलीची गटर खोदण्यात आली आहेत. काही ठिकाणी त्याचे बांधकाम केले आहे. तर काही ठिकाणी ती तशीच सोडली आहेत. त्या गटारीमध्ये पाणी साचले असून चालकाचा ताबा सुटला तर वाहने थेट गटारात कोसळण्याची भीती आहे.

तीन पदरी लेन अचानक संपते तेव्हा..उंब्रजपासून कऱ्हाडपर्यंत महामार्गावर काही ठिकाणी तीन लेन बनविल्या आहेत. लेनचे काम पूर्ण झाल्यामुळे चालक भरधाव वाहने चालवितात. मात्र, काही अंतरावरच एका लेनचे काम अर्धवट सोडलेले असल्याने चालकाला वाहन नियंत्रित करताना कसरत करावी लागते. वाहन नियंत्रित झाले तर ठीक अन्यथा पुढे जाऊन वाहन खड्ड्यात आदळते.

तासवडेत महामार्गाची एक बाजु उद्ध्वस्ततासवडे येथे जुन्या टोलनाक्याच्या जागेवर महामार्गाची एक बाजू पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून एकाच लेनवरुन दुहेरी वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग