ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:11 IST2017-08-31T13:09:10+5:302017-08-31T13:11:36+5:30
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास झाला.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास झाला.
राजमंगल मोहन यादव (वय ३२,मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कृष्णानगर, सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राममंगल यादव हा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरूवारी दुपारी तो काही कामानिमित्त दुचाकीवरून साताºयात येत होता. यावेळी लिंबखिंड परिसरात पुणे बाजूकडून आलेल्या ट्रकने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, राजमंगल सुमारे शंभर फूट दूरवर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. हा अपघात झाला त्यावेळी तेथे कोणीच नव्हते. काही नागरिकांना राजमंगल जखमी अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांनी आणले.
या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर संबंधित ट्रक चालक तेथून पसार झाला. पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत