शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचं हित जोपासणाऱ्या केंद्राचा कारभार धोकादायक

By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST

पृथ्वीराज चव्हाण : आचरेवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

ढेबेवाडी : ‘शेतकऱ्यांच्या दु:खापेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या केंद्रशासनाची चातुर्यवर्णाकडे वाटचाल चालू आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून देशाला पेशवाईकडे घेऊन चाललेल्या शासनाचा कारभार धोकादायक असल्याची भीती,’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी देशात लोकाभिमूख सहकारची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आचरेवाडी-काळगाव, ता. पाटण येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतीक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राहुल चव्हाण, मधुकर पाटील, अभिजित पाटील उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवाराची संकल्पना आणली. राज्यातील वाड्या-वस्त्यांना टँकर दिले. दहा लाख जनावरांना छावण्यांद्वारे जीवदान दिले. स्मार्ट शहराची घोषणा करणाऱ्या शासनाने जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली असून, काळ्या पैशाचे आश्वासन कोठे गेले? असा सवालही त्यांनी केला.’ वंदना आचरे यांनी प्रास्ताविक केले. संजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सिंचन घोटाळ्यावर केले भाष्य... चार वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आघाडी शासन चालविताना कसरत करावी लागते. जनतेचे हित आणि पारदर्शकता आणताना काही मंडळी दुखावली तरीसुध्दा ‘सिंचन’ आणि ‘राज्य शिखर बँकेचे संचालक मंडळ’ बरखास्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरले. या दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.’