शेतात पाणी शिरल्याने टोमॅटोसह वेलवर्गीय पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST2021-06-18T04:26:58+5:302021-06-18T04:26:58+5:30

कोपर्डे हवेली : कऱ्हाड, पाटण तालुक्यात बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे कोपर्डे हवेली परिसरातील ...

Damage to vine crops including tomatoes due to water intrusion in the field | शेतात पाणी शिरल्याने टोमॅटोसह वेलवर्गीय पिकांचे नुकसान

शेतात पाणी शिरल्याने टोमॅटोसह वेलवर्गीय पिकांचे नुकसान

कोपर्डे हवेली : कऱ्हाड, पाटण तालुक्यात बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे कोपर्डे हवेली परिसरातील टोमॅटोसह इतर पिकांचे नुकसान झाले.

कोपर्डे हवेली परिसरात बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गुरुवारी अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. गुरुवारी परिसरात टोमॅटो पिकांचे तोडे साेडून शेतीतील सर्व कामे बंद होती‌. कऱ्हाड-मसूर रस्त्यावरील पूर्वेच्या बाजूला पाणी साठून राहिल्याने शिवार जलमय झाला आहे. हा पाऊस पेरणी झालेल्या पिकाला पूरक मानला जात असला, तरी माळव्याच्या पिकाला हानीकारक आहे. माळ्याच्या पिकात साचलेले पाणी शेतकरी शेतातून काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

फोटो ओळ १७कोपर्डे हवेली रेन

कोपर्डे हवेली परिसरात बुधवारी रात्री पडलेल्या पावसामुळे पाणी शिवारात साचून राहिले होते.

Web Title: Damage to vine crops including tomatoes due to water intrusion in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.