तांबवे येथील नुकसानाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:39 IST2021-07-27T04:39:58+5:302021-07-27T04:39:58+5:30
तांबवे : तांबवे (ता. कऱ्हाड) येथे पुरात झालेल्या नुकसानाची प्रशासकीय अधिकारी तसेच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी ...

तांबवे येथील नुकसानाची पाहणी
तांबवे : तांबवे (ता. कऱ्हाड) येथे पुरात झालेल्या नुकसानाची प्रशासकीय अधिकारी तसेच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला तसेच पावसाचे पाणीही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांबवे पूल पाण्याखाली गेला. गावातही पाणी घुसले होते. अनेक कुटुंब स्थलांतरित करण्यात आली होती. पुलाचे अँगलही तुटले. महापूर ओसरल्यानंतर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी गावाची पाहणी केली. प्रांताधिकारी उत्तम दिघे, सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी पुरातील नुकसानाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, माजी सरपंच जावेद मुल्ला, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, तलाठी ढवण, वैभव शिंदे, नितीन फल्ले उपस्थित होते. प्रांताधिकारी दिघे यांनी महापुरात बाधित झालेल्या कुटुंबांचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना मदत करण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी दिली. तसेच नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी तलाठी व ग्रामसेवकांना दिल्या.