शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

येरळा नदीवरील पाऊण कोटींचा बंधारा अवघ्या दोन दिवसांत कोसळला, तीन वेळा वाढीव निधी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 11:53 IST

गुणवत्ता तपासण्याची तसदी न घेता मृद व जलसंधारण विभागाने देयके पूर्ण करून हिशोब क्लिअर केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड

सातारा : खटाव तालुक्यात येरळा नदीवर सहा वर्षांत तीनवेळा वाढीव निधी खर्च करण्यात आला. तब्बल ८० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा बंधारा अवघ्या दोन दिवसांतच कोसळला. वायू वेगाने याची माहिती पसरल्यानंतर पुन्हा या कामासाठी वाढीव १६ लाखांचा दुरुस्ती निधी देऊन बंधारा बांधला खरा; पण त्याची गुणवत्ता तपासण्याची तसदी न घेता मृद व जलसंधारण विभागाने देयके पूर्ण करून हिशोब क्लिअर केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, येरळा नदीवर ५५ लाख ६६ हजार रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे २०१८-२०१९ मध्ये त्याच बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून १० लाख ७८ हजार रुपयांचा खर्च केले गेला. धक्कादायक बाब म्हणजे बंधारा दोन दिवसांत पडल्यानंतर अधिकारी व ठेकेदार यांनी विचारविनिमय करून पुन्हा यासाठी निधी जिरविण्याची योजना आखली.त्यानुसार बंधारा दुरुस्तीचे काम तब्बल १६ लाख ४१ हजार ८३६ रुपयांचे मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे गुणवत्ता न तपासता याचे देयक मार्च २०२१ मध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आले. प्रत्यक्ष बंधारा भेट देऊन कामाची पाहणी करणे अपेक्षित असतानाही निकृष्ट दर्जाचे, मोजमापमध्ये तफावत असे काम केल्याचे उघड झाले आहे.मृद व जलसंधारण कार्यालय सातारा कोणतीही माहिती या बंधाऱ्याबाबत देत नाही व एकाच छोट्या बंधाऱ्यावर सात वर्षांत ९० लाख खर्च करतात. ही निव्वळ शासनाची फसवणूक व शासनाच्या पैशाची उधळपट्टी आहे, तरी याची सर्व चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प