दलित महासंघाचे कऱ्हाडला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:49+5:302021-01-03T04:36:49+5:30
यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात पुष्पलता सकटे, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, तालुकाध्यक्ष दिलीप ...

दलित महासंघाचे कऱ्हाडला आंदोलन
यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात पुष्पलता सकटे, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, तालुकाध्यक्ष दिलीप सकटे, तालुका संघटक शैलेश भिंगारदेवे, रामभाऊ दाभाडे, राजाभाऊ आवळे, हर्षदा तडाखे, जाई वायदंडे, शांताराम थोरात, भास्कर तडाखे, दिलीप चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, अनुसूचित जातीला १३ टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के, तर ओबीसीसाठी २७ टक्के स्वतंत्र आरक्षण आहे. अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणात ५९ जाती आहेत. त्यातील एकच जात जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेत आहे. आमचा वाटा आम्हाला मिळत नाही. त्यासाठी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. सरकारने बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच आर्टीची स्थापना करावी. अण्णा भाऊ साठे महामंडळ बंद आहे. त्यामुळे तरुण व महिलांना आर्थिक पुरवठा होत नाही. त्यातून एक पिढी गारद करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे महामंडळ सुरू करावे. दलित महिलांवरील अत्याचार थांबला पाहिजे.
आंदोलनात दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो : ०२केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडला तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दलित महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.