तर साताऱ्यात घडतील साहसी ‘सायकल रायडर’

By Admin | Updated: August 13, 2014 23:33 IST2014-08-13T22:35:08+5:302014-08-13T23:33:18+5:30

उद्या ‘सायकल क्रांती’ : सातारची भौगोलिक रचना ‘सायकल रपेट’साठी फायद्याची

'Cycle Rider' will happen in Satara. | तर साताऱ्यात घडतील साहसी ‘सायकल रायडर’

तर साताऱ्यात घडतील साहसी ‘सायकल रायडर’

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या सातारा शहराची भौगोलिक रचना साहसवीरांना भुरळ पाडणारी. उंच-सखल भाग असल्यामुळे येथील रस्त्यांची रचनाही चढ-उतार अशा स्वरूपाचीच; मात्र याचाच फायदा होऊ शकतो साहसी ‘सायकल रायडिंग’साठी!
सातारा येथे स्वातंत्र्यदिनी शुक्रवार, दि. १५ आॅगस्ट रोजी ‘सायकल क्रांती’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. यासाठी अमर सायकल एजन्सीच्या आशिष जेजुरीकर या तरुणाने पुढाकार घेतला आहे. आपल्याकडे सायकल चालविणे कमीपणाचे मानले जाते. मात्र, मोटारसायकल आणि सायकल यामध्ये सर्वात मोठी तफावत काय असेल तर मोटारसायकलीमुळे प्रदूषणात भर पडते; पण सायकल चालविण्यामुळे पर्यावरणाचे काहीच नुकसान होत नाही. शिवाय सायकलमुळे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.
साताऱ्यातील युवकांना रायडिंगची आवड आहे. त्यांच्या या आवडीचे खेळात रुपांतर झाले तर सायकल रायडिंगमध्ये चांगले खेळाडू तयार होऊ शकतात, असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. यासाठी साताऱ्यातील तरुणांचा ग्रुप सायकल क्रांती उपक्रमांतर्गत काम करत आहे. त्यांना योग्य मार्गदशन मिळावे, यासाठी सायकल क्लब स्थापन होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा युवकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Cycle Rider' will happen in Satara.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.