नववर्षात केस कापायला @ 50, फलटण तालुक्यात निर्णय : जीएसटीमुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 15:53 IST2017-12-30T15:48:50+5:302017-12-30T15:53:06+5:30
गेल्या वर्षी नोटाबंदी तर यावर्षी जीएसटीचीच चर्चा होती. या जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना अप्रत्यक्ष बसतही आहे. हे हादरे अद्याप कमी झालेले नाही. जीएसटीमुळे सौंदर्यप्रसादनांचे दर परवडत नाहीत, असे कारण सांगून नवीन वषार्पासून सलूनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय फलटण तालुक्यात घेण्यात आला. त्यामुळे १ जानेवारीपासून कटिंगला पन्नास तर दाढीला तीस रुपये मोजावे लागणार आहेत.

नववर्षात केस कापायला @ 50, फलटण तालुक्यात निर्णय : जीएसटीमुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री
फलटण : गेल्या वर्षी नोटाबंदी तर यावर्षी जीएसटीचीच चर्चा होती. या जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना अप्रत्यक्ष बसतही आहे. हे हादरे अद्याप कमी झालेले नाही. जीएसटीमुळे सौंदर्यप्रसादनांचे दर परवडत नाहीत, असे कारण सांगून नवीन वषार्पासून सलूनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय फलटण तालुक्यात घेण्यात आला. त्यामुळे १ जानेवारीपासून कटिंगला पन्नास तर दाढीला तीस रुपये मोजावे लागणार आहेत.
गोखळी येथे फलटण तालुक्यात नाभिक आरक्षण फाउंडेशनची बैठक झाली. या बैठकीत नवीन वषार्पासून सलून दरवाढ करण्याचा सवार्नुमते निर्णय घेण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार, उपाध्यक्ष नवनाथ काशीद, गणेश काशीद, सचिव नंदकुमार काशीद, पोलिस पाटील किसनराव काशीद, योगेश पवार, जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय राऊत, सचिव सुधीर कर्वे, जिल्हा संघटक रामदास काशीद, गणेश कर्वे, राजेंद्र काशीद, सचिन राऊत उपस्थित होते.
यावेळी सलून व्यवसायिकांना सलूनमधील सौंदर्यप्रसादनांसह इतर वस्तूंचे दर जीएसटीमुळे वाढल्याने जुन्या दरानुसार काम करणे परवडत नाही. याबाबत उपस्थित सलून व्यवसायकांनी मते मांडल्याने चर्चा करुन नवीन वषार्पासून संघटनेचे नवीन दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यामध्ये नवीन वषार्पासून साधी कटिंग पन्नास, साधी दाढी तीस व कटिंग दाढी सत्तर रुपये दर निश्चित करण्यात आले. नवीन दरपत्रकाप्रमाणे सर्व सलूनधारकांनी दर घ्यावेत, जो कमी दर घेईल त्याच्यावर संघटनेमार्फत दंडात्मक कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.
नाभिक समाजबांधवांनी एकत्र येऊन संत सेना महाराज पुण्यतिथीला अभिवादन करणे, वधू-वर मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी विशाल पवार, किसनराव काशीद यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस मठाचीवाडी, राजुरी, गुणवरे, निंबळक, वाजेगाव, बरड, साठे, राजाळे, पिप्रंद, पवारवाडी, विडणी, हनुंमतवाडी, आसू, गोखळी, मेखळी, मुजंवडी आदी गावातील समाज बांधव उपस्थित होते. धनंजय राऊत यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार काशीद यांनी आभार मानले