शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव मतदारसंघातील 'त्या' ऑडिओ क्लिपची चौकशी करा, लेखी तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 12:38 IST

शशिकांत शिंदे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

कोरेगाव : ‘कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील उमेदवारांच्या क्रमावरून चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप नेमकं कोण व्हायरल करत आहे, याचा शोध पोलिसांनी तसेच निवडणूक आयोगाने घ्यावा,’ अशी मागणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आजच लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान शुक्रवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर क्रमांक एकवर आ. महेश शिंदे हे उमेदवार आहेत, तर क्रमांक दोनवर आ. शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत. मात्र, या संदर्भात चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप मतदारसंघात व्हायरल झाली असून त्यामध्ये एक नंबरला मत दिले की शशिकांत शिंदेंना जाईल, असे म्हटले आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे, अशी माहिती महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी मतदारसंघात विरोधकांकडून सुरू असलेल्या दबावतंत्राची माहिती दिली. पोलिस यंत्रणा पूर्णपणे दबावाखाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार करूनही ते लक्ष देत नाहीत. कोणत्या हॉटेलवर कुठले गुंड उतरले आहेत, कोण ऑडिओ क्लिप वायरल करत आहे, याबाबत पोलिसांनी माहिती घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, पोलिस यंत्रणा त्याकडे लक्ष देत नसल्याची खंत आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार आजच दाखल केला आहे. एकंदरीत विरोधकांना निवडणूक अवघड वाटू लागली आहे. कारण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४koregaon-acकोरेगावShashikant Shindeशशिकांत शिंदेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024