शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार?

By दीपक शिंदे | Updated: April 11, 2024 15:31 IST

उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याला अधिकृतता मिळणे आवश्यक

सातारा : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रतीक्षेनंतर आपला उमेदवार जाहीर केला. खरं तर महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करणार होती. पण, अजून वेळ करण्यात काहीच अर्थ नसल्याचे सांगत शरद पवार यांनी आपला साताऱ्याचा उमेदवार जाहीर केला. आता फक्त भाजपकडून कोणाचे नाव यादीत येते याची उत्सुकता लागली आहे. उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याला अधिकृतता मिळणे आवश्यक आहे.सातारा लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच सदस्यांनी सहमती दर्शविली आहे. महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच मेळाव्यांना सुरुवात केली होती. फक्त उमेदवार ठरत नव्हता. आता उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्याने सभा आणि मेळाव्यांना अधिक गती येईल.महायुतीनेही मेळावे आणि प्रचार दौऱ्यांना सुरुवात केली असली तरी त्यांनी अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वच जण बुचकळ्यात आहेत. महायुतीमधून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबत स्पष्टता जाणवत नाही. मात्र, महायुतीतील अनेक नेते उदयनराजे भोसले यांचे उघड नाव घेऊन तेच उमेदवार असतील, असे ठामपणे सांगत आहेत.

भाजप धक्कातंत्रासाठी आघाडीवरभारतीय जनता पार्टी धक्कातंत्रासाठी ओळखली जाते. त्यामुळे ऐनवेळी वेगळा उमेदवार देण्याचीही खेळी खेळली जाऊ शकते. माथाडी कामगार चळवळीतील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यामुळे महायुतीमध्येही नरेंद्र पाटील यांच्या रुपाने एक नेता त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे ऐनवेळी भाजप काहीही निर्णय घेऊ शकते. त्यामुळे उमेदवाराबाबत अजूनही धास्ती आहे.

उमेदवारी मिळण्याबाबत उदयनराजे मात्र ठामभारतीय जनता पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार यावर खासदार उदयनराजे भोसले ठाम आहेत. केवळ मोठा पक्ष असल्यामुळे आणि अनेक जागांवरील उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने थोडा उशीर लागत आहे, असे त्यांनी कऱ्हामध्येही स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४satara-pcसाताराBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले