शरद पवारांच्या आजच्या कऱ्हाड दौऱ्याबाबत उत्सुकता
By Admin | Updated: November 23, 2014 23:43 IST2014-11-23T21:39:10+5:302014-11-23T23:43:42+5:30
पवार तर यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र मानले जातात़

शरद पवारांच्या आजच्या कऱ्हाड दौऱ्याबाबत उत्सुकता
कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी रात्री कऱ्हाडात मुक्कामला येणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली़ यशवंतराव चव्हाण यांची मंगळवारी (दि़ २५) पुण्यतिथी आहे़ त्या पार्श्वभूमीवर पवार मुक्कामाला येत आहेत़ अधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २५ नोव्हेंबरला कऱ्हाडच्या राजकीय पंढरीत नेत्यांची मांदियाळी भरते़ राज्याचे मुख्यमंत्री प्रतिवर्षी चव्हाणांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी येतात़ शरद पवार तर यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र मानले जातात़ त्यामुळे अपवाद वगळता तेही प्रत्येक वर्षी उपस्थित राहतात़ विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार प्रथमच कऱ्हाड दौऱ्यावर येत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याबाबतची उत्सुकता लागली आहे़ उद्याच्या त्यांच्या दौऱ्यात त्यांना कोण-कोण भेटणार, काय-काय चर्चा होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे़ शरद पवार येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कम करणार असून, मंगळवारी सकाळी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत़ (प्रतिनिधी)