शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आल्याच्या शेतात गांजाची लागवड, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By नितीन काळेल | Updated: October 26, 2023 19:06 IST

सातारा : सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे आल्याच्या शेतात गांजाची १८ झाडे आढळून आली. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई करुन ...

सातारा : सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे आल्याच्या शेतात गांजाची १८ झाडे आढळून आली. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई करुन सुमारे १०० किलोहून अधिक गांजा जप्त केला. याची किंमत २७ लाख रुपयांवर आहे. तर याप्रकरणी संबंधितांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांनी अंमली पदाऱ्थांची लागवड आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. त्याप्रमाणे देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे आणि उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन कारवाईबाबत सूचना केली होती. दरम्यान, आज, गुरुवारी (दि. २६) पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदाराकडून सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे लहू कुंडलिक घोरपडे (वय ६२) याने मानकर नावाच्या शिवरात आले पिकात गांजाची लागवड विक्री करण्याच्या उद्देशाने केल्याचे समजले. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाला कारवाईची सूचना केली. त्यानुसार खोजेवाडी जाऊन आले पिकात पाहणी केल्यावर गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक पंतग पाटल, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, लक्ष्मण जगधने, शिवाजी गुरव, हसन तडवी, शिवाजी भिसे, राजू कांबळे, गणेश कापरे, अमित माने, ओमकार यादव, धीरज महाडिक, प्रवीण पवार, वैभव सावंत, संकेत निकम, संभाजी साळुंखे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

१०९ किलो वजन..पोलिसांनी गुंगीकारक आैषधी द्रव्ये आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे अधीनियम १९८५ मधील तरतुदीनुसार शेतातील गांजाची १८ झाडे जप्त केली आहेत. त्याचे वजन १०९ किलो भरले. तसेच या गांजाच्या झाडांची किंमत २७ लाख ३४ हजार ५०० रुपये इतकी आहे. तर जमीन मालकाविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस