शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांच्या उपद्रवामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:51 IST

Animal Abuse, Satara area, Farmer, wildanimal सोनजाई डोंगरावरील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून पाच एकर ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ठळक मुद्देरानडुकरांच्या उपद्रवामुळे पिकांचे नुकसान सोनजाईच्या डोंगरावरील घटना; शेतकरी वर्ग हतबल

वाई: सोनजाई डोंगरावरील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून पाच एकर ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.वाई तालुक्यात ग्रामीण भागात सध्या पाण्याचे स्त्रोत कमी झाले असून, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून नासाडी करताना दिसत आहेत. आरगड ज्वारी खाण्यासाठी आलेली रानडुकरे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोनजाईच्या पठारावर डोंगर भागात रानडुकरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रान डुकरांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रानडुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लपत्या लढविताना दिसत आहे. संपूर्ण शेताला साडीने लपटण्यात येते. या आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येतात. थायमेट घालण्यात येते. तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून शेती फस्त केली जाते.

संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. डोंगर माथ्यावर पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने उन्हाळ्यात हे सर्व जंगली प्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत येऊन उभ्या पिकांचे मोठे नुकसान करतात. परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तक्रार करा.. नुकसान भरपाई मिळेल..वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागकडून नुकसान भरपाई मिळते. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढे येऊन वनविभागाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी वनविभागात तक्रार दाखल करण्याची आवश्यता आहे. तसे आवाहन ही वनविभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी अनेकवेळा वनविभागाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी