शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कोविडपश्चात ‘अभ्यास विस्मृती’चे विद्यार्थ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड काळात कुटुंबात उद‌्भवलेले ताण, समवयस्कांपासून दूर राहिल्याने तुटलेला संवाद, ऑनलाईन अभ्यासाने हाती आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड काळात कुटुंबात उद‌्भवलेले ताण, समवयस्कांपासून दूर राहिल्याने तुटलेला संवाद, ऑनलाईन अभ्यासाने हाती आलेल्या मोबाईलमधून गेमिंगचा पडलेला विळखा, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘ अभ्यास विस्मृती’चा त्रास जाणवू लागला आहे. या मानसिक अस्वस्थतेमुळे मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणंही कठीण होऊन बसलं आहे.

कोविड काळ संपून आयुष्य न्यू नॉर्मल होत असतानाच, आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. या वर्गांमध्ये मुलांनी शरीराने हजेरी लावली असली, तरीही देहाने अद्यापही इतर विश्वातच रममाण आहेत. वर्गात अभ्यास समजून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकाग्रतेचा अभाव कोविडपश्चात अधिक दिसल्याचं शिक्षक सांगत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सोशल कनेक्ट संपुष्टात आल्याने मुलं एकलकोंडी झाल्याच्या तक्रारी पालकांकडून मनोविकारतज्ज्ञांकडे आल्या आहेत. मानसशास्त्रीय भाषेत त्याला ‘एन्झायटी’ असंही संबोधले जाते. लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांनी टोकाचे कलह अनुभवले. मोठ्यांच्यातील या वादाने चिमुकल्यांना हादरवून सोडले. जगात सर्वत्र न्यू नॉर्मल होत असलं, तरीही छोट्यांच्या विश्वात झालेली उलथापालथ अद्यापही शमली नाही. यातून बाहेर कसं पडावं, कोणाशी याविषयी बोलावं, या सर्वचबाबत त्यांचा झालेला कोंडमारा अव्यक्त राहिला. दिवसभर कामाच्या धबडग्यात मोठे नॉर्मल झाले असले, तरीही चिमुकल्यांच्या विश्वात अद्यापही आत्मिक द्वंद्व सुरूच आहे. याचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक करिअरवर होणार आहे. पालकांनीही याचा विचार करून यंदा फार मोठ्या गुणांची अपेक्षा मुलांकडून करू नये, असं तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

एन्झायटी डिप्रेशन वाढलं!

एन्झायटीकडे दुर्लक्ष केलं, तर ही स्थिती एन्झायटी अ‍ॅटककडे नेऊ शकते. यामध्ये मुलांमध्ये कायम भयाची भावना मनात राहते. काहीतरी वाईट किंवा चुकीचंच होणार, अशी त्यांची धारणा होते. वारंवार याच विचारात असणाऱ्या मुलांना आपल्या भावनांवरही नियंत्रण मिळवणं अनेकदा अवघड होऊन बसते. एन्झायटी अ‍ॅटकमध्ये व्यक्तीला सतत चिंता, भीती आणि अस्वस्थता जाणवते. हृदयाचे ठोके वाढतात आणि श्वास भरून येतो.

संवादाची पध्दती बदलणं आवश्यक!

कोविड काळात मानसिक कसोट्यांवर मोठ्यांचा जिथं टिकाव लागला नाही, तिथं छोट्यांची तर गोेष्टच वेगळी आहे. कौटुंबिक अस्थिरता, वैयक्तिक एकटेपण, शैक्षणिक गॅप आणि ऑनलाईन अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांच्या विश्वात उलथापालथ केली.

कोट :

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या भावनांचा निचरा झाला नाही. परिणामी एन्झायटी डिप्रेशनच्या त्रासाला मुलांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी मुलांशी वेगळ्या पध्दतीने संवाद साधणं आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक आहे.

डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ