साताऱ्यात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दहा जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST2021-05-11T04:42:06+5:302021-05-11T04:42:06+5:30
सातारा : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांवर शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ...

साताऱ्यात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दहा जणांवर गुन्हे
सातारा : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांवर शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे व कर्मचारी गस्त घालत असताना विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हवालदार आशिष कुमठेकर यांच्या फियादीनुसार रवींद्र शंकर पाठक (वय ७२, रा. मंगळवार पेठ), शामराव इब्राहिम शेख (वय ३४, रा. बाबर कॉलनी, करंजे), इजाज इकबाल शेख (वय ३३, रा. शुक्रवार पेठ), विनोद विजय शिखरे (वय ४७, रा. व्यंकटपुरा पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर सईद अली हुसेन बागवान (वय ३४, रा. शाहूपुरी), मनीषा सुभाष कोकाडे (वय २०, रा. हेरंब पॉइंट, करंजे), प्रमोद दिलीप पन्हाळे (रा. माजगावकर माळ झोपडपट्टी) यांच्या विरुद्ध हवालदार पंकज मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.
मरीआई कॉम्प्लेक्ससमोर मद्य पिऊन रस्त्यावर वाहने वेडीवाकडी चालवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यशवर्धन दीपक पवार (वय २१, रा. संमित्र हौसिंग सोसायटी), अभिलाष विनोद शिंदे (वय २२, रा. काळेश्वरी सोसायटी), दर्शन मालोजी घोरपडे (वय २१, रा. प्रथमेश कुंज, शाहूनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार शैलेंद्र निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार कारळे तपास करत आहेत.