सरपंचपुत्रांवर गुन्हा
By Admin | Updated: January 14, 2015 23:41 IST2015-01-14T21:30:23+5:302015-01-14T23:41:04+5:30
कातरखटाव येथील घटना : जातीवाचक शिवीगाळ करुन बेदम मारहाण

सरपंचपुत्रांवर गुन्हा
वडूज : कातरखटाव (ता. खटाव) येथील सरपंचांच्या दोन पुत्रांनी माजी उपसभापती पोपट मोरे यांच्या मुलास जातीवाचक शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. या अपप्रवृत्तीला आळा बसण्यासाठी मोरे हे सोमवार, दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करणार आहेत.याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, रविवार दि. ११ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास कातरखटाव येथील बसस्थानकानजिक त्यांचा मुलगा अमर पोपट मोरे (वय २४) याची किरकोळ कारणावरुन दादासाहेब विलास गुजले याच्याशी बाचामाची झाली. ही बाचाबाची सुरु असतानाच गुजले व त्याचे नातेवाईक मारुती भीमराव पाटोळे, रामचंद्र भीमराव पाटोळे व इतर युवकांनी त्यांच्या मुलास बेकायदा जमाव करुन जोरदार मारहाण केली. तसेच त्यास जातीवाचक शिवीगाळही केली. या मारहाणीत अमर मोरे बेशुध्दही पडला. ही गोष्ट मोरे यांच्या कानावर आल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता संबंधित युवकांनी मोरे यांनाही धक्काबुकी व जातीवाचक शिवीगाळ केली.
याबाबत त्यांनी त्याच दिवशी रात्री १ वाजण्याच्या सुमारास वडूज पोलीस ठाण्यात तीन युवकांच्या विरोधात मारहाण व जातीवाचक शिवीगाळीची तक्रार दिली आहे. मात्र तक्रार देऊन चार दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.(प्रतिनिधी)
ठोस कारवाईच नाही
या मारहाणीबाबत त्याच दिवशी रात्री १ वाजण्याच्या सुमारास वडूज पोलीस ठाण्यात तीन युवकांच्या विरोधात मारहाण व जातिवाचक शिवीगाळीची तक्रार दिली आहे. मात्र तक्रार देवून चार दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. याबाबत विचारणा केली असता पोलीस ठाण्याकडून कायद्याच्या तरतूदी सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.