मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST2021-08-18T04:46:18+5:302021-08-18T04:46:18+5:30

सातारा : वाहन वेगाने चालवून दुसऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आगुंडेवाडीच्या एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

Crime record for causing death | मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा नोंद

मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा नोंद

सातारा : वाहन वेगाने चालवून दुसऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आगुंडेवाडीच्या एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शंकर जगन्नाथ चोरगे (वय ४५, रा. चोरगेवाडी, ता. सातारा) यांनी तक्रारी दिली आहे. या तक्रारीनंतर जीवन रवींद्र आगुंडे (रा. आगुंडेवाडी, ता. सातारा) विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ११ ऑगस्ट रोजी सातारा तालुक्यात अपघात झाला होता.

जीवन आगुंडे यांनी आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून तक्रारदारांच्या वडिलांना धडक देऊन जखमी केले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूस व दुचाकी नुकसानास कारणीभूत ठरल्याने तक्रार दिल्यानंतर जीवन आगुंडेविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सातारा तालुका ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ए. जे. पाटील हे तपास करीत आहेत.

................................................

Web Title: Crime record for causing death