प्राण्याशी क्रुरतेने वागल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:21+5:302021-09-11T04:41:21+5:30
सातारा : सातारा शहरात प्राण्याशी क्रुरतेने वागल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली ...

प्राण्याशी क्रुरतेने वागल्याने गुन्हा
सातारा : सातारा शहरात प्राण्याशी क्रुरतेने वागल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी जास्मिन हरुण रशीद अफगाण (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार किसन हणमंत मोहिते (रा. अजंठा चौक, सातारा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास साताऱ्यातील अजंठा चौक झोपडपट्टी येथे रस्त्यावर ही घटना घडली. संशयिताने एका भटक्या कुत्र्याच्या मागच्या पायाला साडीच्या काठाने बांधले होते. त्यानंतर कुत्र्याला दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर संबंधिताने दोरीच्या सहाय्याने कुत्र्याला ओढले. यामध्ये कुत्र्याचे डोके आणि पायास जखम झाली.
तक्रारीनंतर पोलिसांनी प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमाद्वारे हा गुन्हा नोंद केला. सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार जाधव हे पुढील तपास करीत आहेत.