पोलीस अधिकार्‍याविरोधात गुन्हा

By Admin | Updated: May 27, 2014 23:11 IST2014-05-27T23:09:54+5:302014-05-27T23:11:00+5:30

सातार्‍यातील घटना : लाच घेताना मध्यस्थीला पकडले;एक फरार

Crime against a police officer | पोलीस अधिकार्‍याविरोधात गुन्हा

पोलीस अधिकार्‍याविरोधात गुन्हा

सातारा : ‘वडिलांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करू’, अशी भीती दाखवून तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करणार्‍या आणि त्यातील ७० हजार रुपये दुसर्‍या व्यक्तीद्वारे स्वीकारणार्‍याला रंगेहात पकडण्यात आले, तर दरेकर आणि अन्य एकजण फरार झाला. सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकर ‘डीबी’चा कार्यभार सांभाळतात. एका युवकाला वडिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करतो, अशी भीती दाखवून एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर ७० हजारांवर त्यांची तडजोड झाली. संबंधित तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. मात्र, दरेकरने लाच स्वत: न स्वीकारता दिगंबर धवरे ऊर्फ राजू आणि विजय शंकर साळुंखे यांना देण्यास सांगितले होते. मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान महामार्गावरील चौकात तक्रारदाराला त्यांनी बोलावले. ‘एसीबी’ने अगोदरच सापळा लावून तीन टीम तयार केल्या होत्या. तक्रारदाराजवळ दरेकर यांच्या वतीने लाच स्वीकारण्यास विजय साळुंखे हा आला. त्याने तक्रारदाराला रिक्षात बसून वाढे फाट्याकडे नेले. त्यानंतर ‘एसीबी’चे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग केला. महामार्गाच्या शेजारी रिक्षा थांबल्यानंतर विजय साळुंखेकडे तक्रारदाराने ७० हजार दिले. याचवेळी ‘एसीबी’च्या टीमने झडप घालून त्याला रंगेहात पकडले. या घटनेची माहिती गोरख दरेकर आणि त्यांना मदत करणार्‍या दिगंबर धवरे ऊर्फ राजू यांना समजताच दोघे फरार झाले. विजय साळुंखे याला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकर आणि दिगंबर धवरे यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, ‘एसीबी’ची ही या वर्षातील बारावी कारवाई आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against a police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.