विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी चिपळूणच्या एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST2021-06-18T04:27:42+5:302021-06-18T04:27:42+5:30
सातारा: तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी सागर यादव (रा. चिपळूण) या युवकावर सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी चिपळूणच्या एकावर गुन्हा
सातारा: तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी सागर यादव (रा. चिपळूण) या युवकावर सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, संबंधित महिलेला सागर यादव याने एका मुलीच्या नावे फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. बोलण्यादरम्यान, फ्रेंड रिक्वेस्ट असणारी मुलगी नसून मुलगा असल्याचे विवाहितेला समजताच तिने आरोपीचे फेसबुक अकाउंट अनफ्रेंड केले. याचा राग येऊन सागर यादव याने विवाहितेला माझे फेसबुक बंद का केलेस? मी तुझ्या नवऱ्याला काहीही सांगेन, मी तुझ्या घरी येईन, अशा धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादीच्या घराच्या पायरीवर व खिडकीखाली फिर्यादीचे नाव लिहून पुढे आय लव्ह यू असा मजकूर लिहिला. यामुळे पीडित महिलेने सातारा तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर सागर यादव याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार मोरे करत आहेत.