सोशल डिस्टन्सिंगप्रकरणी लग्न मालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST2021-05-11T04:42:12+5:302021-05-11T04:42:12+5:30
कोयनानगर : कोरोनाचा धोका असताना गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियमभंग केल्याप्रकरणी तहसीलदार योगेश टोम्पे यांनी लग्न मालक तसेच क्रिकेटपटूंवर ...

सोशल डिस्टन्सिंगप्रकरणी लग्न मालकावर गुन्हा
कोयनानगर : कोरोनाचा धोका असताना गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियमभंग केल्याप्रकरणी तहसीलदार योगेश टोम्पे यांनी लग्न मालक तसेच क्रिकेटपटूंवर धडक कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसूल केला.
याबाबत माहिती अशी की, रासाटी येथे शनिवारी एक लग्न पार पडले. यामध्ये मास्क वापर न करता सोशल डिस्टन्सिंग बंधन पाळले नसल्याचे प्रशासनास माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार टोम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी रासाटी येथे जाऊन थेट लग्न मालकावर दहा हजारांचा दंड ठोठावला.
तसेच गोषटवाडी येथील पायट्याचावाडा येथे कोरोनाचे अठरा रुग्ण सापडल्याने कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला होता. या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी भेट दिली असता गावातील वीस-पंचवीस युवक विनामास्कचे क्रिकेट खेळताना आढळले. तहसीलदार व अधिकाऱ्यांनी मैदानाकडे धाव घेतली असता सहा जणांना पकडून विनामास्क कारणाने दंडात्मक कारवाई केली. यावेळी अनेकजण पळून गेली.