आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:41+5:302021-06-23T04:25:41+5:30
सातारा : येथील मंगळवार पेठेत राहणाऱ्या एका महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
सातारा : येथील मंगळवार पेठेत राहणाऱ्या एका महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सचिन तानाजी चांगले असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सागर मोहन खामकर (वय ३०, रा. वृंदावन कॉलनी, चिंचवडनगर, चिंचवडगाव, पुणे. मूळ रा. सनगरवाडी, पो. उरुल, ता. पाटण) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची बहीण वैशाली सचिन चांगले ( रा. चैतन्यराम अपार्टमेंट, शनिवार पेठ, फुटका तलाव, सातारा) हिने पती सचिन चांगले याच्या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजी राहत्या घरी फॅनला साडी गंुंडाळूऊ आत्महत्या केली होती. याप्रकरणी दि. २१ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव हे करत आहेत.