शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

कारागृहात मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: March 6, 2025 21:35 IST

कपडे तपासताना सिमकार्ड सापडले; पोलिसांकडून कसून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली.राजू उत्तम निकम (वय ५०, रा. माहुली, ता. खानापूर, सांगली), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

राजू निकम यांचा मुलगा शुभम निकम याला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून तो कारागृहात आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचे वडील राजू निकम हे आले होते. त्यांनी मुलाची कपडे कारागृहात दिली. कारागृहातील मुख्य दरवाजाजवळ कर्मचाऱ्यांनी कपड्यांची तपासणी केली असता पॅन्टच्या खिशामध्ये त्यांना मोबाइलचे सिमकार्ड सापडले. त्यानंतर कारागृहातील कर्मचारी राकेश पवार यांनी दि. ६ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी बंदिवान शुभम आणि त्याचे वडील राजू निकम यांच्यावरही गुन्हा दाखल केला. हवालदार महेंद्र पाटोळे हे अधिक तपास करीत आहेत.कारागृहात मोबाइल तर नाही ना..

मुलासोबत बोलता यावे म्हणून वडिलांनी कारागृहात मुलाला सिमकार्ड दिले. याचा अर्थ कारागृहात मोबाइल तर नाही ना, अशीही शंका पोलिसांना आहे. परंतु कारागृहात जॅमर असतानासुद्धा मोबाइल सुरू कसा राहील, असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे कपडे धुतल्यानंतर चुकून सिमकार्ड कपड्यातून गेले नसेल ना किंवा सापडलेले कार्ड बंद असेल तर या गुन्ह्याची तीव्रता कमी होईल. परंतु जर का हे कार्ड पूर्वी कोणी वापरत असेल व सध्या ते सुस्थितीत असेल तर नक्कीच कुठेतरी पाणी मुरतेय, हे सिद्ध होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी