गायीसाठी पाळीव कुत्र्याने दिला जीव!

By Admin | Updated: July 29, 2016 23:21 IST2016-07-29T22:34:43+5:302016-07-29T23:21:24+5:30

बिबट्याचा हल्ला : चोरांबे शिवारात ग्रामस्थ भयभीत; बंदोबस्त करण्याची मागणी

Cows gave livestock to a pet! | गायीसाठी पाळीव कुत्र्याने दिला जीव!

गायीसाठी पाळीव कुत्र्याने दिला जीव!

मेढा : मेढा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या मेढा-महाबळेश्वर मार्गावर चोरांबे गावाच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी बिबट्याने गायीचा पाठलाग केला. यावेळी एका कुत्र्याने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून ठार मारले. यामुळे चोरांबे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, तुषार सपकाळ यांच्या घरातील गायी चोरांबे गावाच्या डोंगरालगत असलेल्या खडक नावाच्या क्षेत्रात चरायला सोडल्या होत्या. गायींना रानात चरायला सोडून तुषार सपकाळ घरी आले.
सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान गायी गावाकडे पळत आल्या. गायी पळत आल्या म्हणून गावातील लोकांना संशय आल्याने तुषार सपकाळ व त्यांचा चुलत भाऊ हे दोघे रानाकडे गेले असता गायींबरोबर असणारे कुत्रे दिसले नाही. त्यावेळी खडक रान असलेल्या ठिकाणापासून डोंगराकडे रक्त सांडल्याचे दिसले. त्यानंतर रात्री साडेआठपर्यंत परिसरात शोध घेतला असता कुत्रे फरफटत नेल्याच्या व बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले.
रात्री दहाच्या सुमारास चोरांबे गावचे नागरिक, युवक या डोंगर परिसरात गेले. त्यांनी फटाके लावून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला.
बॅटऱ्यांच्या साह्याने शोध घेतला असता एका जाळीत बिबट्याचे डोळे चमकल्याचे दिसले. बिबट्याबरोबर आण्
ाखी एक बिबट्या असल्याचे जाणवले.
यावेळी फटाके वाजवून, बॅटरीचा झोत मारून, आरडाओरड करूनही ते जागचे हालले नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

म्हणे, माणूस मेला
तरच तक्रार घेतो...
कुत्रे बिबट्याने मारल्याचे आढळल्यानंतर सरपंचांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी ‘ बिबट्याने माणूस मारला असेल तरच आम्ही तक्रार घेतो,’ असे उत्तर दिले. यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली आहे.

Web Title: Cows gave livestock to a pet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.