धारदार शस्त्राने वार करून चुलत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 13:11 IST2020-05-21T13:09:55+5:302020-05-21T13:11:03+5:30

घरगुती भांडणाचा राग डोक्यात ठेवून धारदार सुरीने गळ्यावर वार करून चुलत्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री खटाव तालुक्यातील कुकुडवाड येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Cousin murdered by stabbing | धारदार शस्त्राने वार करून चुलत्याचा खून

धारदार शस्त्राने वार करून चुलत्याचा खून

ठळक मुद्देधारदार शस्त्राने वार करून चुलत्याचा खूनपूर्वीच्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून कुकुडवाडमध्ये कृत्य

कुकुडवाड : घरगुती भांडणाचा राग डोक्यात ठेवून धारदार सुरीने गळ्यावर वार करून चुलत्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री खटाव तालुक्यातील कुकुडवाड येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माण तालुक्यातील कुकुडवाड (कारंडेवाडी) येथील संदीप ऊर्फ पप्पू वसंत चव्हाण (वय २६) हा युवक दारू पिऊन घरात सतत भांडण करत होता. चार दिवसांपूर्वी संदीपची चुलता लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण (वय ५०) यांच्यामध्ये पूर्वीच्या वादातून भांडण झाले होते.

चुलते लक्ष्मण चव्हाण हे सोमवारी रात्री घराच्या बाहेर झोपले असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून संदीप याने दारूच्या नशेत चुलत्याच्या गळ्यावर धारदार सुरीने वार केले. जखम खोलवर जाऊन रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी संदीप चव्हाण याने घटनास्थळावरून पळ काढला असून, सध्या फरार आहे.

खुनाची माहिती म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस शिवारात शोध घेतला. घटनेचा पंचनामा करून संदीप चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे तपास करत आहेत.

 

Web Title: Cousin murdered by stabbing