‘काॅर्पोरेट कोरोना वॉरियर’ म्हणून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:18+5:302021-01-10T04:30:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड लॉकडाऊन काळात केलेल्या मदतीसाठी फरोख कूपर व मनीषा कूपर यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल ...

‘काॅर्पोरेट कोरोना वॉरियर’ म्हणून
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविड लॉकडाऊन काळात केलेल्या मदतीसाठी फरोख कूपर व मनीषा कूपर यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ‘कॉर्पोरेट कोरोना वॉरियर’ म्हणून सत्कार करण्यात आला.
साताऱ्याच्या मातीशी अनुरूप होऊन सामाजिक बांधीलकी जोपासून मोठा उद्योग म्हणून नावारूपास आलेल्या कूपर उद्योग समूहाचे ९९ वर्षांत पदार्पण झाले आहे. सर धनजीशा कूपर यांच्यापासून नरिमन कूपर व आज फरोख कूपर यांनी सामाजिक बांधीलकीचा वारसा अव्याहत पुढे चालवत उद्योगाची अविरत प्रगती केली आहे.
फरोख कूपर यांनी १९७० पासून कूपर उद्योग समूहाला त्यांच्या नेतृत्वाखाली नवी उभारी दिली. गेल्या दोन दशकांत कूपर उद्योग समूहाने सामाजिक बांधीलकीचा वारसा जपत अलौकिक प्रगती केली. आज सातारा जिल्ह्यातील या स्वदेशी उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष तीन हजार व अप्रत्यक्ष अधिक दोन हजार अशा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत सातारा शहराला २०० करोडोपेक्षा जास्त ‘जीडीपी’ची दरवर्षी मदत केली.
कोरोनाच्या संकटात कामगार व कर्मचाऱ्यांना कोरोनाशी सामना करण्यासाठी विविध उपाय योजनांच्या माध्यमातून पाठबळ दिले. तसेच कोरोनाच्या अवघड काळात कामगार व कर्मचाऱ्यांसाठी ३००० पेक्षा जास्त मास्कचे वाटप, तर ४००० पेक्षा जास्त कॅम्पर-१ या होमिओपॅथिक टॅब्लेटचे वितरण, २००० पेक्षा जास्त आयुस वाथ या कोरोना विरोधक, प्रतीकारक शक्ती निर्माण करणाऱ्या गोळ्यांचे वितरण केले. कूपर उद्योगात कार्यान्वित असलेल्या सुमारे ३००० कामगार, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने त्यांचे आरोग्याचे सतत, वैद्यकीय टीमच्या माध्यमातून परीक्षण केले. शासनाने सूचित केलेल्या कोविड-१९ प्रतिरोधक योजनांचे प्रोसिजर मॅन्युअल बनवून शॉप फ्लोअरमध्ये कामाच्या ठिकाणी ट्रेनिंग दिले. मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंग व हाताची स्वच्छता या सवयी लावण्यासाठी हँड बिल, सोशल डिस्टन्सिंग राखत छोट्या मीटिंग माध्यमातून कोविड-१९ संदर्भात कामगार व कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती केली गेली. (वा.प्र.)
फोटो आहे..
09कूपर
कोविड लॉकडाऊन काळात केलेल्या मदतीसाठी फरोख कूपर व मनीषा कूपर यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ‘कॉर्पोरेट कोरोना वॉरियर’ म्हणून सत्कार करण्यात आला.