शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

CoronaVirus Lockdown : कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून विनापरवाना घुसखोरी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 4:11 PM

कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपरात्री काही महाभाग घुसखोरी करून घरी जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. या परिस्थितीत स्थानिक जनतेने अधिक दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे. चेकनाक्यावर पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून काही महाभागांनी घुसखोरी केलेली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्त जिल्ह्यातून विनापरवाना घुसखोरी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली चेकनाक्यावर कडेकोट पहारा; जिल्हावासीयांना अधिक दक्ष राहावे लागणार

सागर गुजरसातारा : कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपरात्री काही महाभाग घुसखोरी करून घरी जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. या परिस्थितीत स्थानिक जनतेने अधिक दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे.चेकनाक्यावर पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून काही महाभागांनी घुसखोरी केलेली आहे.स्थानिक प्रशासन संबंधितांना होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून घरात बसण्याच्या सूचना करत असले तरी यापैकी अनेकजण होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून घेत नाहीत. होम क्वॉरंटाईनचा शिक्का असूनदेखील अनेकजण बेकायदा फिरत आहेत.

हेच लोक स्थानिक लोकांशी वाद देखील घालत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले तर आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची काळजी जिल्हा प्रशासनाला लागून राहिलेली आहे. 

प्रशासनाच्या मंजुरीशिवाय कुणालाही सातारा जिल्ह्याकडे पाठवू नये, अशा सूचना मुंबई व पुणे येथील प्रशासनाला केलेल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यातून आलेले लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. आता लोकांचा लोंढा वाढत असताना या सर्वांची कोरोना तपासणी करणं अशक्य असल्यानं बाधित वाटताहेत त्यांची तपासणी केली जात आहे.-शेखर सिंह,जिल्हाधिकारी, सातारा

जिल्हा प्रशासनापुढील अडचणी मुंबई-पुण्यामध्ये ज्या भागात कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर झाली आहे, त्या ठिकाणच्या सातारकरांना गावाकडे परतायचे आहे; परंतु प्रतिबंधित क्षेत्रामधून कुणालाही बाहेर सोडले जात नाही. आता असे लोक चोरीछुपे रात्री-अपरात्री जिल्ह्यात एन्ट्री करतायेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर