CoronaVirus Lockdown : उंब्रजच्या युवकावर कऱ्हाडमध्ये अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:51 IST2020-04-22T11:48:10+5:302020-04-22T11:51:00+5:30
कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल उंब्रजचा युवक व कृष्णा रुग्णालयात दाखल साळशिरंबेच्या वृद्धेचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यापैकी साळशिरंबेच्या वृद्धेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. उंब्रजच्या युवकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा उंब्रजच्या युवकाच्या मृतदेहावर कऱ्हाडातच अंत्यसंस्कार केले.

CoronaVirus Lockdown : उंब्रजच्या युवकावर कऱ्हाडमध्ये अंत्यसंस्कार
कऱ्हाड : कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल उंब्रजचा युवक व कृष्णा रुग्णालयात दाखल साळशिरंबेच्या वृद्धेचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यापैकी साळशिरंबेच्या वृद्धेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. उंब्रजच्या युवकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा उंब्रजच्या युवकाच्या मृतदेहावर कऱ्हाडातच अंत्यसंस्कार केले.
त्यावेळी संबंधित युवकाचा भाऊ उपस्थित होता. संशयित असूनही संबंधित युवकावर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृताच्या भावाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.
उंब्रजमधील युवकाला सोमवारी दुपारी कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. तसेच साळशिरंबेच्या वृद्धेलाही श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते.
दोघांच्याशी घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता सोमवारी रात्री अचानक दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासन हादरले. दोघांचाही श्वसनाच्या तीव्र जंतू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
साळशिरंबेच्या वृद्धेवर तिच्या गावीच अंत्यसंस्कार केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर उंब्रजच्या युवकाच्या मृतदेहावर कऱ्हाडात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.