शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus Lockdown : लग्न पुढे ढकलले; पण आनंद कायम टिकवला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:39 IST

मेढा येथील वनपरिक्षेत्रअधिकारी महांतेश बगले यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले; पण त्याचवेळी या संकटात शंभर गरजू कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आनंद द्विगुणित केला.

ठळक मुद्देलग्न पुढे ढकलले; पण आनंद कायम टिकवला!अनोखा उपक्रम : शंभर कुटुंबांना साहित्य वाटप

सातारा : लग्नाची तारीख ठरल्यापासून नवरा-नवरीच्या मनाची घालमेल चाललेली असते. एकीकडे अनामिक भीती तर दुसरीकडे लग्न कधी होईल, असे वाटत असते. स्वप्न रंगवण्यात मन गुंतलेलं असतं. अनेकांच्या या स्वप्नावर कोरोनाने पाणी फेरलं. पण मेढा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी महांतेश बगले यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले; पण त्याचवेळी या संकटात शंभर गरजू कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आनंद द्विगुणित केला.सांगली जिल्ह्यातील उमदी, ता. जत येथील महांतेश मल्लाप्पा बगले हे गेली अडीच वर्षांपासून सातारा जिल्ह्यात वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सध्या ते मेढा येथे कार्यरत आहेत. त्यांचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील मल्लिकार्जून बिराजदार यांची कन्या रुपाली यांच्याशी ठरला.

लग्न ठरल्यापासून धामधूममध्ये तयारी सुरू होती. लग्न सोहळ्याला सर्वांना येता यावे, म्हणून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपलेल्या असतील, अशा बेताने ५ मे ही तारीख निश्चित केली.सर्व तयारी सुरू असतानाच देशात कोरोनाचे संकट आले. लग्नाला येण्याची तर प्रत्येकांचीच इच्छा आहे. पण जास्त संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरले असते. त्यामुळे हा सोहळा दोन्ही कुटुंबांनी चर्चा करून पुढे ढकलला.

पण त्याचवेळी त्यांनी कोरोनामुळे कामधंदा गेलेल्याने अडचणीत आलेल्या शंभर कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे जीवनाश्यक वस्तू दिल्या. त्या मिळाल्यावर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून लग्न पुढे ढकलल्याचे काहीच वाईट वाटले नाही.रेशनवर मिळणारे वस्तूंशिवाय सर्वशासनाकडून गरजूंना स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ पुरवला जातो. मात्र, त्यांना इतर जीवनाश्यक वस्तूच मिळत नाहीत. त्यामुळे गहू, तांदूळ वगळता तेल, तूरदाळ, मूगदाळ, साखर, चहा पावडर, शेंगदाणे, अंगाचा साबण, कपड्यांचा साबण, मीठ, तिखट, जिरे-मोहरी दिले. त्याचप्रमाणे कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर दिले.गरजूंची यादी तहसीलमधूनकोणत्याही वस्तूंचे वाटप करत असताना ते खऱ्या गरजूंना मदत होतेच असे नाही. हे ओळखून बगले यांनी मेढा तहसीलमधून गरजू आणि निराधार व्यक्तींची यादी मिळविली. त्यानंतर संबंधित लोकांच्या वस्ती, घरोघरी जाऊन त्यांनी या वस्तूंचे वाटप केले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे उपस्थित होते. कातकरी वस्तीवर वस्तू मिळाल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण होते.

माझं लग्न ५ मे रोजी होते. त्यामुळे गावाकडून बोलावले जात होते; पण आपण तेथे गेल्याने तेथील समाजाला संसर्गाचा धोका असू शकतो. हे ओळखून गावी न जाणे पसंत केले. पुणे, मुंबईहून येणाऱ्यांनी हा विचार करायला हवा. त्यामुळे गावकऱ्यांनाही त्रास होणार नाही.- महांतेश बगले, वन परिक्षेत्र अधिकारी, मेढा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग