शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 1:17 PM

सोमवारी एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये वडील आणि मुलाचा समावेश असून, जिल्ह्याचा आकडा आता १३८ वर पोहोचला आहे. रुग्णांचे निगेटिव्ह अहवालही येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत असून, ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना बाधितवडील अन् मुलाचा समावेश; ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात एकीकडे रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये वडील आणि मुलाचा समावेश असून, जिल्ह्याचा आकडा आता १३८ वर पोहोचला आहे.

रुग्णांचे निगेटिव्ह अहवालही येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत असून, ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना प्रवासादरम्यान कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. मूळचे सातारा तालुक्यातील नांदगाव येथील ६७ वर्षीय वडील आणि २६ वर्षीय मुलगा हे दोघे काही दिवसांपूर्वी मुंबई (ठाणे) येथून गावी आले होते. तर मूळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबईहून प्रवास करून आलेली ३२ वर्षीय महिला साताऱ्यात आली होती.

या तिघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यातील उंब्रजमधील २२ आणि ५३ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

या दोघांवर कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित आढळल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा हादरून गेले आहे.दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालय येथे २६, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथे ६४ व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील ३ अशा एकूण ९३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या १३८ झाली आहे. कोरोनामुक्त होऊन ६६ जण घरी गेले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७० कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर