CoronaVirus Lockdown | CoronaVirus Lockdown : मजूरांना छतीसगडला घेऊन जाणारा टेम्पो पकडला

CoronaVirus Lockdown : मजूरांना छतीसगडला घेऊन जाणारा टेम्पो पकडला

ठळक मुद्देमजूरांना छतीसगडला घेऊन जाणारा टेम्पो पकडलापोलिसांनी घेतले ताब्यात, ट्रेनने मुळ गावी पाठविणार

ढेबेवाडी/ सातारा : पाटण तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सुमारे ऐंशी मजूरांसह लहान बालके असे शंभराहून जास्त लोकांना घेऊन जाणारा टेंपो ढेबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला.

छत्तीसगढला जाणाऱ्या टेंपोसह या सर्व मजूरांना रात्री बाराच्या सुमारास कराड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी यातील पाटण तालुक्यात काम करणाऱ्या मजूरांना ढेबेवाडी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले तर उर्वरित कराड तालुक्यात काम करणाऱ्या मजूरांना कराड पोलीसांकडे पाठविण्यात आले.

दरम्यान या सर्व मजूरांची रितसर सर्व प्रकारच्या शासकीय बाबींची पूर्तता करून त्यांना बस किंवा ट्रेनने त्यांच्या मुळ गावी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Web Title: CoronaVirus Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.