CoronaVirus Lockdown : मजूरांना छतीसगडला घेऊन जाणारा टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:52 IST2020-05-18T10:50:44+5:302020-05-18T10:52:47+5:30
पाटण तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सुमारे ऐंशी मजूरांसह लहान बालके असे शंभराहून जास्त लोकांना घेऊन जाणारा टेंपो ढेबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला.

CoronaVirus Lockdown : मजूरांना छतीसगडला घेऊन जाणारा टेम्पो पकडला
ढेबेवाडी/ सातारा : पाटण तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सुमारे ऐंशी मजूरांसह लहान बालके असे शंभराहून जास्त लोकांना घेऊन जाणारा टेंपो ढेबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला.
छत्तीसगढला जाणाऱ्या टेंपोसह या सर्व मजूरांना रात्री बाराच्या सुमारास कराड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी यातील पाटण तालुक्यात काम करणाऱ्या मजूरांना ढेबेवाडी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले तर उर्वरित कराड तालुक्यात काम करणाऱ्या मजूरांना कराड पोलीसांकडे पाठविण्यात आले.
दरम्यान या सर्व मजूरांची रितसर सर्व प्रकारच्या शासकीय बाबींची पूर्तता करून त्यांना बस किंवा ट्रेनने त्यांच्या मुळ गावी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.