कराड : राज्याचे सहकार मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचा शुक्रवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री उशिरा त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही, अशी माहिती कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
CoronaVirus: बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 06:39 IST