कोरोनाबाधित बंदिवानाचा पुण्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:38 IST2021-04-15T04:38:35+5:302021-04-15T04:38:35+5:30

सातारा : कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात पोस्को गुन्ह्यातील न्यायालयीन बंदीचा पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती ...

Coronated prisoner dies in Pune | कोरोनाबाधित बंदिवानाचा पुण्यात मृत्यू

कोरोनाबाधित बंदिवानाचा पुण्यात मृत्यू

सातारा : कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात पोस्को गुन्ह्यातील न्यायालयीन बंदीचा पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आली. दत्ता ऊर्फ श्यामकुमार बाळासाहेब पाटील (वय २७) असे बंदिवानाचे नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील धामणी येथील आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्ता पाटील याच्यावर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याला दि. २७ मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना दि. ३१ मार्च रोजी मृत्यू झाला. त्यानंतर सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनंतर याची शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: Coronated prisoner dies in Pune